जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख निवडीवरून सांगली शिवसेनेत संतापाची लाट उसळली.
संजय विभूते यांच्या निवडीनंतर सांगली जिल्ह्यातील 100 शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.
तसेच गेल्या 22 वर्ष असणारे शिवसैनिकांचे कार्यालय बंद करण्यात आले. तसेच कार्यालयावर असणारे शिवसेनेचे फलक उतरवून आपला संताप व्यक्त केला.
जिल्हाप्रमुखपदी संजय विभूते यांच्या निवडीनंतर सांगली जिल्ह्याच्या शिवसैनिकात आगडोंब उसळला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.