तुम्हाला माहीत आहे, कुठे होते ‘चोर गणपती’ची प्रतिष्ठापना?

तुम्हाला माहीत आहे, कुठे होते ‘चोर गणपती’ची प्रतिष्ठापना?

श्री गणेशाची अनेक नावे रुपं आहेत ज्याचे नाव घेतल्याशिवाय आपणाकडे शुभकार्यास सुरूवात होत नाही, तो संकट निवारक गणेश चोर कसा असेल... मात्र, सांगलीत चक्क ‘चोर गणपती’ आहे. होय. विघ्नहर्ता गणपती स्वतःच ‘चोर गणपती’ कसा असेल, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण सांगलीत मात्र शतकांपासून या ‘चोर गपपती’ची परंपरा आहे.

 

श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे.मात्र नियमित गणपतीबरोबरच येथे चोर गणपती बसवण्याची शतकांपासूनची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधीच या गणेशाची भक्तीभवाने प्रतिष्ठापना केली जाते. हे गणपती बाप्पा कधी येतात आणि कधी जातात, याचा सांगलीकरांना पत्ताच लागत नाही. म्हणूनच चोर पावलांनी येणाऱ्या विघ्नहर्त्याला ‘चोर गणपती’ म्हणण्याची प्रथा रूढ झाली आहे.

श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा ‘चोर गणपती’ बसवला जातो. 

विशेष बाब म्हणजे दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून (इको फ्रेंडली) मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून ही मूर्ती आहे तशी आहे.  हा गणपती दीड दिवसांचाच असतो आणि या मूर्तीचं विसर्जनही केलं जात नाही. या मूर्तीला एका ठिकाणी सुखरूप ठेवलं जातं.

या चोर गणपतीबरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते.  5 दिवस सोहळा असतो.

राजे विजयसिंह यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात.

पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिध्द असून हा नवसाला पावणारा गणपती आहे.

या परिसरात एकात्मता मंदिरही असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्मग्रंथ ठेवण्यात आले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version