जय महाराष्ट्र न्यूज, सागंली
सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांचं एक धक्कादायक कृत्य समोर आलंय. सांगली पोलिसांच्या या धक्कादायक कृत्यानं एकच खळबळ उडालीय.
पोलीस कोठडीतील आरोपी अनिकेत कोथलेला बेदम मारहाण केली..ही मारहाण इतकी जबर होती की, आरोपी जागीच ठार झाला.
पोलिसांचं हे कृत्य इतक्यावर थांबलं नाही तर ही हत्या दाबवण्यासाठी आंबा घाटात पेट्रोल ओतून मृतदेह जाळला. त्यानंतर मॄतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर आरोपी पळून गेल्याचा बनाव पोलिसांनी केला. मुख्य सूत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह चार पोलीस आणि एक झिरो पोलीस, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना अटक करण्यात आलीय..दमदाटी आणि पैसे उकळणे याप्रकरणी या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.