पाकच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे 2 सुपूत्र शहीद

पाकच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे 2 सुपूत्र शहीद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बॅट) आज  नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला आहे.

 

बॅटने केलेल्या या हल्ल्यात लष्करात सेवेत असलेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले आहे.

 

श्रवण माने आणि संदीप जाधव अशी वीरमरण आलेल्या दोन जवानांची नावे आहेत.

 

जम्मूमधील पुंछ विभागात पाकिस्तानी लष्कराच्या बॅट तुकडीने हा हल्ला केला.

 

भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल केलेल्या हल्ल्यात बॅटचा एक सैनिक ठार झाला तर एक सैनिक जखमी झाला.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version