वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सॅमसंग कंपनीच्या अधिकृत व्हिएतनामी वेबसाइटनुसार सॅमसंगने J2 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या खास वैशिष्ट्यांची चर्चा मागील महिन्यांपासून सुरु होती. सॅमसंग J2 Pro ड्युअल सिम फोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅशचे समर्थन होते.
J2 प्रोमध्ये 2GB रॅमसह 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे, जे मायक्रो एसडी कार्ड स्लॉटद्वारे विस्तारित आहे. या स्मार्टफोनची किंमत अगदी सर्वसामान्यांना परवडणारी म्हणजेच 9,200 इतकी आहे. तसेच, सॅमसंग j2 Pro ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर्समध्ये उपलब्ध आहेत.
सॅमसंग j2 Pro ची खास वैशिष्ट्ये :
5इंच डिस्प्ले एमोलेड (540×960)
1.4Ghz क्वॉर्ड कोअर प्रोसेसर
1.5 जीबी रॅम, 16जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते
8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड नॉगट ही ऑपरेटिंग सिस्टम
2600 mAh रिमूव्हेबल बॅटरी
ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर व्हेरिअंट
ब्ल्यूटूथ, यूएसबी पोर्ट, हेडफोन जॅक सारखे फीचर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.