समीर वानखेडेंचे जातप्रमाणपत्र सादर

समीर वानखेडेंचे जातप्रमाणपत्र सादर

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबी विभागाचे संचालक समीर वानखेडे यांना जातप्रमाणपत्र प्रसिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. आता समीर वानखेडे यांनी जातप्रमाणपत्र सादर केले आहे.

  समीर वानखेडे म्हणाले, मी मागासवर्गीय आहे. आणि नवाब मलिक माझ्या जातप्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करत आहे. त्यामुळे माझा छळ होत असल्याचे समीर वानखेडे म्हणाले.

  समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे धाव घेतली आहे. अरुण हलदर हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. समीर वानखेडे आणि अरुण हलदर यांच्यात जातप्रमाण पत्रांवरील आरोपांबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच वानखेडे यांनी जातप्रमाणपत्र सादर केल्याचे अरुण हलदर यांनी सांगितले आहे.

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जातप्रमाणपत्र ट्विटरवर शेअर केला होता. तसेच त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे  असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर जातप्रमाणपत्राबाबत केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांनी त्यांचा जातप्रमाणपत्र प्रसिद्ध करण्याचे आव्हान मलिकांनी वानखेडेंना दिले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version