भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षण प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला ६ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशाराही दिलेला आहे. शिवाय, त्यांनी राज्यभर दौरा सुरू केला असून, विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीसही सुरूवात केली आहे. दरम्यान, संभाजीराजेंनी ‘राज्य सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे’, असं ट्विट करत राज्य सरकारवर आरोप केला आहे.
‘सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?’, असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे.
माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
दरम्यान संभाजीराजे यांचा हा हेरगिरीचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळला आहे. ‘संभाजीराजे यांच्या हालचाली प्रसारमाध्यमे सांगतायत. कोण कशाला हेरगिरी करेल?’, असा प्रतिसवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता आमदार विद्या चव्हाण यांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.