Sambhajinagar Crime : बँक कर्मचाऱ्याला भरदिवसा लुटलं, 25 लाखांची रोकड लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेमधून दावरवाडी येथील शाखेत रोख रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात दोन चोरट्यांनी दुचाकीवरून लुटले.
Sambhajinagar Crime : बँक कर्मचाऱ्याला भरदिवसा लुटलं, 25 लाखांची रोकड लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर / विजय चिडे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेमधून दावरवाडी येथील शाखेत रोख रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कर्मचाऱ्याच्या स्कुटीला कट मारून त्यांच्यावर दगड मारून त्यांच्या गाडीतील तब्बल पंचवीस लाख रोख रक्कम त्या चोरांनी लंपास केल्याची घटना 15 नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे. भरदिवसा रस्त्यावर बँक कर्मचाऱ्याला लुटण्यात आले असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत.

या विषय अधिक माहिती अशी समोर आली आहे की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून दावरवाडी येथील बँक कर्मचारी गणेश आनंद पहीलवान (वय 65) हे शनिवारी सकाळी 10.15 वाजता आपल्या स्कुटीवरून निघाले होते.  पाचोड- पैठण रस्त्यावरून येत असताना दावरवाडी शिवारात 11च्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी  पाठीमागून भरधाव वेगाने येत त्यांच्या स्कुटीला कट मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या स्कुटीवर दगड मारून त्यांच्याकडे असणारे रोख पंचवीस लाख रुपये हिसकावून घेतले.

या घटनेनंतर गणेश पहीलवान याने तात्काळ त्यांच्या शाखा अधिकाऱ्यांना झालेल्या घटनेची माहिती दूरध्वनीवरून दिली आणि संबंधित चोरट्यांचा काही काळ पाटलागही केला. परंतु चोरट्यांनी सुसाट वेगामध्ये त्या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक राम बहाराते, पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत, पोलीस कर्मचारी संदीप वैद्य, अण्णासाहेब गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चोरट्यांचा मागोवा काढला, तर या घटनेची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक पनव इंगळे, संतोष मिसाळे, विष्णू गायकवाड, विठ्ठल डोके,अशोक वाघ , शिवानंद बन्गे,अनिल काळे, राहुल गायकवाड,संनी खरात, योगेश तळमाळे यांनीही तात्काळ घटनास्थळी येऊन सर्व घटनेची पाहणी करून आपल्या पद्धतीने तपासाचे चक्र फिरवले आहे. या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यामध्ये  पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मागील काही महिन्यांपासून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी दरोडा या घटनेमध्ये मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहेत. गंभीर गुन्ह्याचा मागील काही दिवसापासून तपास लागेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता चोट्यांचे मनबोल वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस यंत्रणाही कुचकामी झाली काय असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाचोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाचोड पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण गुन्हेगारीच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून चोरी प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पाचोड पोलिसांना आरोपी पकडण्यासाठी प्रतिष्ठापणाला लागली आहे. यामुळे पाचोड पोलिसांना या गुन्हातील आरोपी पकडणे समोर एक मोठा आव्हान असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version