जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनीसुद्धा उदयनराजे भोसले यांना पठिंबा दिला. रविवारी सभाजीराजे यांनी उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली.
ज्या अडचणीचा उदयनराजे सामना करत आहेत त्या अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे पुर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा हे छत्रपती घराण्याला चांगल माहित आहे.
तसंच संकट ही आम्हाला नवीन नाहीत. लवकरच ते यामधून बाहेर पडतील असा विश्वास संभाजीराजे यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.