घटस्फोटांनंतरही समंथाचा टॅटू कायम

घटस्फोटांनंतरही समंथाचा टॅटू कायम

बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणेच दाक्षिणात्य अभिनेत्रींनीही आपल्या सौंदर्याची सर्वांना भुरळ पाडली आहे. यातील अभिनेत्री समंथा रुतप्रभू हिचे जगभरात अनेक चाहते आहेत. समंथा तिच्या चित्रपटांच्या व्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक जीवनासाठी नेहमी चर्चेत असते. नुकतच तिने ‘सिटाडेल’च्या प्रीमियरला हजेरी लावली होती. यावेळचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु यात एका खास गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्री समंथाने अलीकडेच तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी तिने काळ्या रंगाचा अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता. तिचे या ड्रेस मधील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. परंतु अशातच सगळ्यांचे लक्ष गेले ते तिच्या कंबरेच्या उजवीकडील टॅटूकडे. हा टॅटू पाहून इंटरनेटवर चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेत्री समंथाने तिच्या पोटाच्या उजव्या बाजूला कमरेच्या वर ‘चाय’ नावाचा टॅटू काढला आहे.हा टॅटू तिच्या पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यशी संबंधित आहे. घटस्फोटानंतरही तिने हा टाकतो न काढल्याने चर्चा रंगू लागल्यात. दरम्यान, समंथा सध्या अभिनेता वरुण धवनसोबत ‘सिटाडेल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version