समंथाचा पहिला पती एका अभिनेत्रीला करतोय डेट ?

समंथाचा पहिला पती एका अभिनेत्रीला करतोय डेट ?

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : हिंदी चित्रपट सृष्टीप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या जोड्या देखील चर्चेत असतात. यातील एक जोडी म्हणजे अभिनेता नागा चित्यनं आणि सामंथा प्रभू यांची जोडी. या दोघांच्या घटस्फोटांनंतर हे आता कोणाला डेट करत आहेत यांची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे, दरम्यान नागा चैतन्य एका अभिनेत्रीला डेट करारात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

अभिनेता नागा चैतन्य सध्या त्याच्या आगामी कस्टडी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान अलीकडेच त्याचा अभिनेत्री आणि मॉडेल शोभिता धुलीपाला हिच्या सोबतच एक फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. .

नुकतंच या दोघांचा एका फॅन्सी रेस्टॉरंटमधील फोटो व्हायरल झालाय. त्यामुळे बऱ्याच शक्यता वार्तवल्या जात आहेत. यावर आपापली प्रतिक्रिया देत शोभिला म्हणाली, “मीडिया एखाद्या गोष्टीवरून ठिपके जोडत माझ्या वैयक्तिक किंवा लव्ह लाइफबद्दल अंदाज लावत आहे, हे मला आवडत नाही. कारण ही माझी अतिशय वैयक्तिक बाब आहे. नागा चैतन्यबाबत शोभिताने तिच्या कथित नात्याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, ‘मी सध्या फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. मला चांगले चित्रपट करायचे आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयीच्या अफवांची मला पर्वा नाही.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version