जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
संपकरी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण, सलग पाच दिवस सुरू असलेल्या शेतक-यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित केला आहे.
सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे-
शेतकऱ्यांच्या पेटलेल्या वेदनांवर आता आश्वासनांची फुंकर उपयोगाची नाही हाच सोमवारच्या ‘कडकडीत बंद’ने राज्यकर्त्यांना दिलेला इशारा आहे. त्यापासून योग्य धडा घेतला नाहीतर आज उफाळून आलेला शेतकरी वेदनेचा लाव्हा उद्या भयंकर उत्पात घडविल्याशिवाय राहणार नाही.
शेतकऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’ प्रचंड यशस्वी झाला. मात्र ही लढाईची सुरुवात आहे. ती पुढेही सुरूच राहील. शेवटची मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू ठेवावाच लागेल. शिवसेना पूर्वीही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती, आजही आहे आणि उद्याही राहीलच.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.