आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपच्या तिजोरीत आणि मंत्र्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये आहेत; शिवसेनेची टीका

आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपच्या तिजोरीत आणि मंत्र्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये आहेत; शिवसेनेची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्रातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफीसाठी संपावर गेला तेव्हाही त्याच्या छाताडावर बंदुका रोखून धमकावण्याचा प्रयत्न झाला.

हा संप फोडताना जी आश्वासने सरकारने दिली ती पूर्ण झाली नाहीत. म्हणून काल शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरला. मात्र, त्या शेतकऱ्यांवरदेखील पोलिसांनी अमानुष गोळीबार केला आहे. सरकारचे हे कृत्य अमानुष असल्याची टीका सामनातून करण्यात आलीये.

काय आहे सामनाच्या अग्रलेखात 

नगरचे शेतकरी हिंसक झाले हे समजण्यासारखे आहे

 पण ते हिंसक का झाले? शेतकऱ्यांचा गुन्हा काय?

या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत

राज्यात सध्या सत्तेवर असलेल्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आकाशातून चंद्र-सूर्य आणून देऊ अशा घोषणा केल्या होत्या

पण आज शेतकरी हमीभावासाठी रोज मरण पत्करत आहे

शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला पैसे नाहीत

पण आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपच्या तिजोरीत व मंत्र्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये आहेत

शेवगावच्या रस्त्यावर झालेले उस उत्पादकांचे आंदोलन हा त्याचाच उद्रेक आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version