जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
चीन-भारतमध्ये तणाव सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी गुजरात राज्यसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले.
यावर शिवसेनेनं सामनातून सडेतोड टीका करत, टोले लगावलेत.
सामनातून नक्की काय म्हणण्यात आले
– देश संकटात असताना सत्ताधारी व विरोधक गुजरातच्या एका राज्यसभा जागेसाठी एकमेकांवर तलवारी चालवतात. हे राजकारण किळस आणणारे आहे
– पण ‘हमाम में सब नंगे’ अशीच सध्या स्थिती असल्याने दोष तरी कोणाला द्यायचा?
– चीनशी मुकाबला करण्यासाठी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनीच छातीचा कोट करून लढण्याची तयारी करायला हवी
– पण गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार यावरच सत्ताधारी व विरोधी पक्षाने बराच वेळ, पैसा, सत्ता व दबंगगिरी खर्च केली
– गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत पटेल यांना पाडण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग आणि काळ्या पैशांचा अमाप वापर झाला या आरोपांत तथ्य असेल…
– तर मग देशात स्वच्छ काय झाले? डबकी तशीच आहेत व सगळ्यांचाच विहार याच डबक्यांत सुरू आहे
– हिंदुस्थानातील डोक्यांची डबकी झाल्याची खबर चीनला असल्यानेच कश्मीरमध्ये सैन्य घुसवण्याच्या धमक्या चीन देत असावा
– गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंनी लावलेली ताकद डोकलामला लावली असती तरचिनी सैन्याने एव्हाना माघार घेतली असती असा टोला उद्धव
ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधकांना लगावलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.