“दादा,कुछ तो गडबड है!” सामनातून अजित पवारांवर टीकास्त्र

“दादा,कुछ तो गडबड है!” सामनातून अजित पवारांवर टीकास्त्र

सामनातून अजित पवारांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेतील रडण्यावरूनही अजितदादांना टोला लगावण्यात आला आहे. अजित पवार यांना हुंदका फुटला हे खरेच असेल, राजीनाम्याआधी चार दिवसांपासून ते विधानसभा अध्यक्षांच्या संपर्कात होते आणि त्यांनी राजीनामा देण्याची वेळ नक्की केली होती. जर त्यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल, तर त्या संघर्षाच्या  दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, “दादा,कुछ तो गडबड है!”..

सामनातून सवाल

अजित पवार यांचे रडणे एक राजकीय नाटक असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही’ अशा मराठीजनांस प्रिय असलेल्या संवादफेकीने शरद पवार यांनी माहौल मस्त तयार केला. महाराष्ट्रातून असंख्य वतनदार खाशा फौजा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. असं ही अग्रलेखात म्हंटले आहे.

‘ईडी’नेच यावर मार्ग काढत शरद पवार यांना थांबवलं तर पहिल्या अंकाचा पडदा पडला व दुसऱया अंकाचा ताबा अजित पवार यांनी घेतला. अजित पवार यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला व अज्ञातवासात गेले. आणि पुढे शरद पवारांनी ‘नको ते राजकारण, त्यापेक्षा शेती करावी’’, अशी अजित पवारांची इच्छा असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

यानंतर राजीनाम्याचं कारण सांगताना अजित पवार यांना हुंदका आवरला नाही. हे सगळं राजकिय नाट्य असल्याचे अग्रलेखात म्हटलं आहे. अजितदादा चार दिवसांपासून ते विधानसभा अध्यक्षांच्या संपर्कात होते. जर त्यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल, तर त्या संघर्षाच्या  दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, “दादा,कुछ तो गडबड है!” असं अग्रलेखात म्हटलं होतं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version