सामनातून छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखाण; सामना वृत्तपत्राची होळी

सामनातून छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखाण; सामना वृत्तपत्राची होळी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सोलापुरात  सकल मराठा समाजाच्या वतीने  संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलय. तसेच सामना वृत्तपत्राची देखील होळी करण्यात आलेय.

खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या 15 ऑक्टोबरच्या अंकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अक्षेपार्ह लिखाण केलं होतं.

त्यांच लिखाण चुकीचं असून त्यामुळे समस्त मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.

फक्त मराठी मतं मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मागून मराठी माणसांच्या भावना दुखावणारं वर्तन करायचं ही शिवसेनेची दुहेरी खेळी असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version