सैनिकांनो, बंदुका मोडा व कश्मिरींना मिठ्या मारा- सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका

सैनिकांनो, बंदुका मोडा व कश्मिरींना मिठ्या मारा- सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्वांत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणावरून शिवसेनेनं मोदींवर टीका केली. मोदींच्या संयमी भाषणावर ‘सामना’तून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

 

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे-

 

कश्मीरचा हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल.

 

अनेक मुद्यांना त्यांनी हात घातला आहे व अत्यंत ‘संयमी’ वगैरे पद्धतीने त्यांनी संदेश दिला आहे. नेहमीचे गुद्दे गायब व फक्त मुद्देच मुद्दे असे त्यांच्या भाषणाचे स्वरूप दिसते

 

“ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!” खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते

 

आता हा विचार अमलात आणण्यासाठी एकच करा, कश्मीरातील 370 कलम लगेच हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी कश्मीरात जातील व तेथील लोकांच्या गळाभेटी घेतील

 

सैनिकांनो, बंदुका मोडा व कश्मिरींना मिठ्या मारा, पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचे आम्ही स्वागत करीत आहोत !

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version