सामनातून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका

सामनातून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. मुंबईत आलेला जलप्रलय असो किंवा त्यानंतर

कोसळलेली हुसेनी इमारत असो या सर्वांवरून सरकारला सामनातून जाब विचारला आहे.

 

राज्याचे गृहनिर्माण खाते नेमके करते तरी काय ? असा सवाल करुन मुख्यमंत्र्यांवरतीच सामनाने टीका केली आहे.

अग्रलेखामध्ये 29 ऑगस्टला पडलेल्या धो धो पावसाने मुंबईची जी तुंबई झाली होती त्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे.

तसेच सातत्याने होत असणाऱ्या इमारतींच्या दुर्घटनांना जबाबदार कोण असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

 

दरम्यान सरकारद्वारा एका बाजूला स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला मुंबईसारख्या  शहरास पक्के

गृहनिर्माण धोरणच नाही अशी टीका सामनाद्वारे सरकारवर केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version