अभिनेता सलमान खानच्या अंगरक्षकावर बलात्काराच्या धमकीचा गुन्हा दाखल

अभिनेता सलमान खानच्या अंगरक्षकावर बलात्काराच्या धमकीचा गुन्हा दाखल

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर एका महिलेने बलात्काराच्या धमक्या दिल्याचे आरोप लावले आहेत. पीडित महिला एका एनजीओमध्ये काम करते. याच महिलेने बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलेल्या जुबैर खानची मदत केली होती. जुबैरने यापूर्वीच सलमान विरुद्ध खटला दाखल

केला आहे. महिलेने लावलेल्या आरोपानुसार, शेराने महिलेला जुबैरची मदत करू नये अशी तंबी दिली होती. तिने ऐकण्यास नकार दिला, तेव्हा सलमानच्या बॉडिगार्डने कथितरीत्या तिला बलात्काराची धमकी दिली. खार पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयर दाखल करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version