सलमानच्या ‘हिट अॅंन्ड रन‘ याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची आज सुनावणी

सलमानच्या ‘हिट अॅंन्ड रन‘ याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची आज सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या सलमान खान विरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपक कपूर यांच्या अध्येक्षतेखालील खंडपीठासमोर याप्रकरणी आज सुनावणी होईल. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले होते. या याचिकेत सलमानने दारूच्या नशेत गाडी चालवून मुंबईतील फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडले,  असा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर उच्च न्यायालयाने पुरेशा पुराव्यांअभावी सलमान खानची या हिट अँड रन प्रकरणातून निर्दोष म्हणून मुक्तता केली होती. त्यानंतर राज्य सरकारने सलमान विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version