मुंबई, ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी :‘अभिनेता सलमान खान याला मिळणाऱ्या धमक्या आणि वाढलेली सुरक्षा यामुळे तो जास्त चर्चेत आला आहे.काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला धमकीचा मेल आला होता. यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यातही आली.चौकशीत मेलचं कनेक्शन थेट यूकेमधून असल्याचं समोर आलं होतं. पुन्हा एकदा सलमानला फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.सलमानच्या रक्षणासाठी सध्या त्याला मुंबई पोलिसांनी Y+ सुरक्षा दिली तसंच याव्यतिरिक्त सलमाननं स्वतःसाठी एक बुलेटप्रूफ गाडी खरेदी केली आहे. सलमानच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गाडी मॉडिफाय करण्यात आली आहे. या कारला सलमाननं आंतरराष्ट्रीय बाजारातून खरेदी केलं आहे.
‘३० एप्रिलला सलमान खानची हत्या करू’ अशी अभिनेत्याला फोनवर धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने स्वत:ची ओळख रॉकी भाई अशी करुन दिली. रॉकी भाई एक गोरक्षक असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.नुकतीच सलमान खान ने एका वाहिनीच्या मुलाखतीत सांगितले की, माझं रस्त्यावर सायकल चालवणं देखील कठीण झालं आहे. आणि मी जेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकतो तेव्हा माझी जास्त सुरक्षा केली जाते आणि माझ्या आजूबाजूला असलेल्या सुरक्षितेच्या गाड्यांमुळे तेथील नागरिकांना त्रास होतो.
‘ते माझे चाहतेच आहेत पण तरी ते आमच्याकडे वैतागून पाहतात. पण माझ्यावर धोका आहे म्हणून मला हे सर्व कराव लागतंय. सलमान खानच्या म्हणण्याप्रमाणे,त्याला जे सांगितलं जात ते तो करतो. आपल्याला सावधानता बाळगून राहिलं पाहिजे हे आता सलमाननं चांगलं ओळखलं आहे. म्हणून तो सुरक्षा व्यवस्था सोबत घेऊनच सगळीकडे फिरतो.पण त्याला हे देखील माहिती आहे की,जर काही होणारच असेल तर ते आपण काहीही केलं तरी होण्यापासून थांबवू शकत नाही.धमकीनंतरही सलमानला एका मुलाचा कॉल आला होता ज्यानं सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याप्रकरणात त्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे .
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.