Saksham Tate Case: न्यायासाठी अग्निपरीक्षा ! सक्षम ताटेच्या प्रेयसीसह आईचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

दोषी पोलिसांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत, सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार आणि त्याच्या आईने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.
Saksham Tate Case: न्यायासाठी अग्निपरीक्षा ! सक्षम ताटेच्या प्रेयसीसह आईचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Saksham Tate Case: राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या सक्षम ताटे मृत्यू प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत, सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार आणि त्याच्या आईने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोघींनाही रोखले.  

नेमका वाद काय?

आत्मदहनाच्या प्रयत्नादरम्यान आंचल आणि सक्षमच्या कुटुंबीयांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाल्याने परिसरातील तणाव वाढला होता. नांदेड शहरातील जुनागंज भागात 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याला संपवण्यात आलं होतं. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून आंचलच्या वडिलांनी, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी सक्षमला संपवलं. यातील मुख्य आरोपी सध्या तुरुंगात आहेत.

हेही वाचा – ACB Action : पगार 1 लाख, संपत्ती 100 कोटी! तेलंगणा उपपरिवहन आयुक्ताच्या 'छुप्या साम्राज्या'चा पर्दाफाश

पोलिसांवर गंभीर आरोप

आंचल मामीडवार हिने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिचा असा दावा आहे की,  इतवारा पोलीस ठाण्यातील कर्मचारी माही दासरवाड आणि धीरज कोमूलवाड यांनी तिच्या अल्पवयीन भावाला हत्येसाठी प्रवृत्त केले. 'सक्षम तुझ्या बहिणीला फिरवतो, त्याला मारून मगच पोलीस स्टेशनला ये,' असे चिथावणीखोर वक्तव्य या पोलिसांनी केल्याचा आरोप आंचलने केला आहे.

हेही वाचा – Chandrapur Kidney Racket: फेसबुकवर मैत्री, व्हॉट्सॲपवर डील! कंबोडियातील किडनी तस्करीचं मोठं जाळं एका चुकीमुळे उघडलं

न्यायासाठी संघर्ष आणि इशारा

दरम्यान, या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांना वारंवार निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आजच कारवाई झाली नाही, तर आम्ही पुन्हा जीवन संपवण्याचा प्रयत्न करू, असा संतप्त इशारा आंचल आणि सक्षमच्या आईने प्रशासनाला दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version