जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
शिर्डीतील साईबाबांच्या पादुका बाहेर नेणं बंद करावं अशी मागणी साईबाबांच्या समकालीन भक्तांचे वंशज सर्जेराव कोते यांनी केलीय. साईबाबा समाधी वर्षाच्या निमित्ताने शिर्डीच्या साईबाबांच्या पादुका साई संस्थान देश विदेशात भक्तांच्या दर्शनासाठी घेवून जातं. मात्र, त्यामुळे पादुकांचं पावित्र राखल जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पादुकांच्या भ्रमणाच्या आडून काही लोकं आर्थिक फायदा करवून घेतात, त्यामुळे या पादुका संस्थानाबाहेर नेणं बंद करावं अशी मागणी सर्जेराव कोते यांनी केलीय. तसंच संस्थानच्या निर्णयाविरोधात उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.