komal mane
सध्या राज्यातील शेतकरी पावसाने झालेल्या नुकसानी मुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागे उभे राहावं, असे आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. तसेच, काल सागर बंगल्यावर फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला आणि यांन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना सागर बंगला कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी ‘टोला लगावला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या राज्यात जे घटतंय ते लोकशाहीला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या राज्यघटनेप्रमाणे नाही. त्यामुळे आम्हा सर्वांना एकत्र येऊन याचा विरोध करावा लागणार आहे. तसेच, पुढे बोलताना त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर मोहित कंबोज यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यावरुन टिका केली आहे. सागर बंगला कदाचित वॉशिंग मिशनसारखं काम करतो, असं ते म्हणाले.
भाजप नेते मोहित कंबोज हे देखील फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. फोन टॅपिंग प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलं आहे. ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारच्या काळात चौकशी सुरु झाली आणि रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. आता सत्तांतर झाल्यानंतर या प्रकरणाचं पुढं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.