जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
मी बाबरी पडायला गेले होते आणि लवकरच राम मंदिर बांधायला जाणार आहे, असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलंय. त्या औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या.
सध्या देशात काम चांगलं सुरु असल्याचाही दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलाय. शिवाय, मला देश जे काम करायला लावेल ते मी करेन. देश हितासाठी काहीही करायची तयारी आहे, असं म्हणत त्यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिलेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.