म्हणून साध्वी प्रज्ञासिंगला जामीन मंजूर…

म्हणून साध्वी प्रज्ञासिंगला जामीन मंजूर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मालेगाव 2008 बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर उर्फ साध्वी व लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. या निर्णयाकडे तपास यंत्रणांसह सर्व राज्याचे लक्ष लागलं.

 

एप्रिल 2016 मध्ये एनआयएने साध्वीला क्लीनचीट देत आरोपींवरील ‘मकोका’ हटवला. त्यानंतर साध्वीने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, विशेष न्यायालयाने तिच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत, असे म्हणत तिचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला साध्वीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version