जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून हाकलपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर करवीरनगरीत त्यांनी ही घोषणा केली.
कर्जमुक्तीचा अर्ज भरण्याची मुदत अजून 15 दिवस वाढवण्याची मागणी सदाभाऊंनी रयत क्रांती संघटनेच्या मंचावर केली. कोणीही कितीही दंगा करु दे, यंदा ऊस आंदोलन होणार नाही.
ऊसाला चांगला भाव मिळणार असं आश्वासनही सदाभाऊ खोत यांनी दिले. आता मी एकटा नाही, माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत. 30 तारखेला इचलकरंजीमध्ये 30 हजारांचा मेळावा घेणार असा इशाराही त्यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.