शासकीय दौऱ्यात सदाभाऊ खोतांनी केले संघटना बांधणीचे काम

शासकीय दौऱ्यात सदाभाऊ खोतांनी केले संघटना बांधणीचे काम

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आपल्या शासकीय दौऱ्यात संघटना बांधणीचे काम करत आहेत. रविवारी सदाभाऊ खोत यांचा कोल्हापूर येथे शासकीय दौरा होता.

 

परंतु, या दौऱ्यादरम्यान त्यांनी संघटना बांधणीचे काम केले. दसऱ्याला सदाभाऊ खोत आपल्या संघटनेची स्थापना करणार आहेत.

 

दसऱ्याच्या कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण यावेळी खोत यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे सदाभाऊ खोत शासकीय खर्चातून संघटनेची बांधणी करत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

 

त्यामुळे भविष्यात, शासकीय दौऱ्यात संघटना बांधणीचे काम केल्यामुळे सदाभाऊ खोत अडचणीत सापडण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version