रक्षाबंधनलाच तुटली नात्याची बंधनं; सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी

रक्षाबंधनलाच तुटली नात्याची बंधनं; सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

सदाभाऊंविरोधातील तक्रारींबाबत स्वाभिमानीने पक्षांतर्गत चार सदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी याबाबत पुण्यात पत्रकार परिषद

घेऊन सदाभाऊंच्या हकालपट्टीची घोषणा केली.

 

सदाभाऊ यांच्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित झाली. शिवाय, त्यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे असं दशरथ सावंत यांनी म्हटले.

 

राज्य मंत्रिमंडळातील सदाभाऊंची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. त्यामुळे सदाभाऊंनी मंत्रिपद सोडून जागा रिकामी करावी, असं आवाहन दशरथ सावंत

यांनी केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version