स्टॅनच्या गोलदांजीवर सचिनचा षटकार

स्टॅनच्या गोलदांजीवर सचिनचा षटकार

सध्या आय पी एल सुरु असल्याने क्रिकेट प्रेमी मॅच बघण्यात व्यस्त आहेत. क्रिकेट म्हंटल की लगेच डोळ्यासमोर येतो तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन. एकदा तरी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची भेट व्हावी अशी अनेकांची इच्छा असते. अशातच बिग बॉस सिझन १६ चा विजेता सुप्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन आणि सचिन तेंडुकलर यांची भेटी झाली.यावेळी त्यांच्यात क्रिकेटचा सामना देखील रंगला आहे.


एमसी स्टॅनने सचिन सोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे . त्यामळे सध्या सर्वत्र एमसी स्टॅन आणि सचिन तेंडुलकर यांची चर्चा होत आहे. या व्हिडिओत सचिन फलंदाजी तर एमसी स्टॅन गोलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओला ‘महापुरुष सचिन तेंडुलकर यांच्यासोबत गोलंदाजी… क्रिकेटचा देव…. आभारी आहे… हक से!!!’ असे कॅप्शन दिले आहे. यामुळे त्यांचे चाहते खुश झालेत आणि या पोस्ट खाली चाहत्यांनी चक्क वेगवेगळ्या कंमेंट्सचा वर्षाव केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version