सचिन-स्वप्नील पडद्यावर झळकणार पुन्हा एकत्र

सचिन-स्वप्नील पडद्यावर झळकणार पुन्हा एकत्र

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई  

सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी लवकरच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. 2008 मध्ये आलेल्या ‘आम्ही सातपुते’ या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली आणि याचं अनोख्या बाँडिंगला प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली.

आता हीच जोडी तब्बल 10 वर्षांनी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवणार आहे मात्र आता ही जोडी पडद्यावर पिता-पुत्राच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाची कथा काय? ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येणार? या प्रश्नांची उत्तरं अजून मिळाली नसली तरीही या जोडीला पडद्यावर एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच आनंदाची बाब ठरेल.      

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version