देशाला खरा धोका हा ‘बाटग्यां’पासूनच- सामनातून मुख्यमंत्र्यांसह रावसाहेब दानवेंना चिमटे

देशाला खरा धोका हा ‘बाटग्यां’पासूनच- सामनातून मुख्यमंत्र्यांसह रावसाहेब दानवेंना चिमटे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जीएसटीवरुन सेना भाजपमधला वाद पेटला. मुंबई महापालिकेला धनादेश देताना सेना-भाजपमध्ये तर राडेबाजी झाली. याचवेळी मोदी मोदी अशा घोषणा भाजपकडून देण्यात आल्या. यावरुनच सामनातून फटकेबाजी करण्यात आलीय. मोदीनामाचा उन्माद करु नका.

 

भाजपमधले बाटगेच मोदी मोदी करतात. याच बाटग्यांचा देशाला खरा धोका आहे असा इशाराच सामनामधून देण्यात आला. शिवसैनिकांनी याच बाटग्यांच्या कानाखाली शिवसैनिकांनी वाघाची मुद्रा उमटवली. शिवसेनेच्या वाटेत मांजरासारखे आडवे याल तर याद राखा असाही इशारा संपादकीयमधून देण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version