लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी बोट उलटल्याच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या सईश मर्दे या 5 वर्षांच्या मुलाचा मृतदेह अखेर सापडला आहे. राजभवनाजवळील किनाऱ्यावर साईशचा हा मृतदेह माशांनी अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला.
मूळ पालघरचा असणारा साईश आपल्या पालकांसोबत लालबागला मामाकडे आला होता. लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी बाप्पाचा तराफा घेऊन ज्या बोटी खोल समुद्रात गेल्या होत्या, त्यांच्यापैकी एका बोटीत साईश आपल्या आई आणि बहिणीसोबत होता. दुर्दैवाने ही बोट उलटली. तेव्हापासून साईश बेपत्ता होता. तटरक्षक दल, नौदल, हवाई दल साईशचा अहोरात्र शोध घेत होते. मात्र सईशचा पत्ता लागत नव्हता.
अखेर मलबार हिल पोलिसांना साईशचा मृतदेह आज सापडला. शरीर माशांनी खाल्ल्यामुळे प्रथम ओळख पटत नव्हती. मात्र गळ्यातील लॉकेट आणि टीशर्टमुळे साईशची ओळख पटली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.