आरपीएफ जवान ठरला जीवनदाता

आरपीएफ जवान ठरला जीवनदाता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील मस्जित बंदर इथं एका इसमाला रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणाला आरपीएफ जवानानं जीवनदान दिलंय. रेल्वे स्टेशन मस्जिद बंदर प्लॅटफॉर्मवर उतरून प्लॅटफॉर्म 3-4 वर जाताना रेल्वे रूळावर उतरला. मात्र समोरून रेल्वे येत असल्यानं तरूण रेल्वे समोर आला. त्याचवेळी आरपीएफ ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल नितीन अवसरमल यांनी ट्रेन थांबताच तातडीनं रेल्वे खाली गेलेल्या तरुणाला बाहेर काढले.

मुस्तफा इद्रिस शेख असं या तरुणाचं नाव आहे. रेल्वे खाली आल्यानं मुस्तफाचे दोन्ही हात फ्रॅक्चर झालेत. मात्र, तरूण जिवंत होता. तातडीनं त्या मुलाला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे सर्वांनी कॉन्स्टेबल नितीन अवसरमल यांचं कौतुक केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version