…म्हणून रेल्वे पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले प्राथमिक उपचाराचे ट्रेनींग

…म्हणून रेल्वे पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले प्राथमिक उपचाराचे ट्रेनींग

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कुर्ला रेल्वे स्थानक हे मुंबईताल गर्दीच्या स्थानकांपैकी एक! या रेल्वे स्थानकात रोज अपघात हे ठरलेलेच असतात.

गेल्या आठवड्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा हृद्यविकाराचा झटक्यानं मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रवाशांवर अशी परिस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून रेल्वे पोलीस कर्मचार्यांना प्राथमिक उपचार पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलं.

मुंबईतील प्राख्यात कोहिनुर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कुर्ला रेल्वे पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षणामुळे रेल्वे स्थानकात एखाद्याची प्रकृती खराब झाल्यास त्याला त्वरीत रेल्वे स्थानकातच प्राथमिक उपचार मिळू शकणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version