येथील 5 रुपयांतील चपाती-भाजी, शिवभोजन थाळीपेक्षा जास्त ‘हिट’!

येथील 5 रुपयांतील चपाती-भाजी, शिवभोजन थाळीपेक्षा जास्त ‘हिट’!

26 जानेवारी रोजी सुरू झालेल्या 10 रुपयांतील शिवभोजन थाळीला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय. काही ठिकाणी तर लोकांची शिवभोजन थाळी चाखण्याकरता झुंबड उडाली आहे. मात्र कोल्हापूरमध्ये सरकारच्या शिवभोजन थाळीपेक्षा माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘चपाती भाजी’च शिवभोजन थाळीपेक्षा लोकांना जास्त आवडते आहे.

काय आहे ‘चपाती- भाजी’?

दीड वर्षांपूर्वी ‘संवेदना फाऊंडेशन’च्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ झाला होता.

शिवभोजन थाळी जशी 10 रुपयांना मिळतेय, तशी चपाती भाजी एवघ्या 5 रुपयांत मिळतेय.

या मध्ये केवळ पाच रुपयात दोन चपात्या आणि भाजी देण्यात येते.

गरीब,गरजू, बाहेरगावाहून येणाऱ्या नोकरदार लोकांसाठी ही योजना सुरू केली होती.

ही योजना आजही सुरू आहे.

शिवभोजन थाळीसाठी नोंदणी करावी लागत असताना 5 रुपयांची चपाती-भाजी मात्र कोणत्याही नोंदणीशिवाय मिळते.

त्यामुळे चपाती भाजी योजनेला अजूनही जास्त गर्दी होत आहे.

विशेष म्हणजे अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांना तसंच एकाकी वृद्ध व्यक्तींना घरपोच चपाती भाजी पुरवली जाते.

शिवभोजन थाळी योजनेत मर्यादित प्रमाणातच वितरण होत असताना आणि चपाती भाजीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अशा प्रकारच्या योजना आणखी असायला हव्या. किंवा आणखी केंद्र उभी करणं गरजेचं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version