जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
काँग्रेस नेते रोहित टिळक अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. बलात्कारासह धमकी आणि आर्थिक फसवणुकीचाही आरोप त्यांच्यावर आहे.
रोहित टिळक हे लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि लोकमान्य टिळक विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांचे सुपुत्र आहेत. पीडितेच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.