Rohit Pawar : दादांच्या विमान अपघाताचे गुढ उलघडणार? रोहित पवारांच्या पोस्टमुळे राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे आज म्हणजेच 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघाताबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत.
Rohit Pawar : दादांच्या विमान अपघाताचे गुढ उलघडणार? रोहित पवारांच्या पोस्टमुळे राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अजित पवार विमान अपघात प्रकरणात आता नवं वळण समोर आलं आहे. दादांच्या निधनानंतर राजकिय वर्तुळात अनेक विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर राजकीय वर्तूळातून अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्षांनी देखील संशय व्यक्त केला आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे आज म्हणजेच 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघाताबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. अशी माहिती त्यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आज त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्यांच्या पत्रकार परिषदेबाबत सांगितलं आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा- Mohan Bhagwat : ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिला तर त्या सन्मानाची प्रतिष्ठा…’ भागवतांनी एका वाक्यात प्रश्नाचे उत्तर दिले
यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी) सायंकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version