जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
नवी मुंबईतील बँक दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 दरोडेखोर बँकेच्या शाखा परिसरात फिरताना दिसतायेत.
या दरोडेखोरांना सीसीटीव्हीची माहिती होती आणि त्यामुळे त्यांनी आपले चेहरे दिसणार नाहीत, अशा पद्धतीने ते परिसरात वावरताना दिसताहेत. खोदकामासाठी वापरण्यात आलेली हत्यारं पोलिसांच्या हाती लागले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
तर बँक दरोड्यातील संशयिताचा फोटा जारी करण्यात आलाय. दुकानासाठी गाळा घेणाऱ्या भाडेकरूचा हा फोटो आहे. गेना बच्चन प्रसाद असं या भाडेकरूचं नाव आहे. गेनानं गाळा भाड्यानं घेतल्यानंतर 2 महिन्यांतच आजारपणाच्या बहाण्यानं तो गावी गेला.
त्याआधी त्यानं 2 तरुणांना आपल्या दुकानात कामाला ठेवलं होतं. दरम्यान 2 जणांनी दरोड्याच्या 2 दिवस आधी शेजारच्या एटीएम सेंटरवरून इस्टेट एजंटला सुक्षारक्षकाच्या मोबाईलवरून फोन केला होता… आणि 2 दिवसांनंतर गावी जाणार असल्याचं आणि गाळ्याचं भाडं देण्याचं सांगितलं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.