नाशिकच्या शिवाजीनगर भागात स्टेट बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रताप चोरट्यांनी केलाय. अवघ्या 20 मिनिटात 28 लाखांची रोकड लंपास करण्यात चोरट्यांना यश मिळालंय. विशेष म्हणजे यापूर्वीही हेच एटीएम दोन वेळा फोडण्यात आलं होतं.
शिवाजीनगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममधून पहाटे 3 च्या सुमारास दोन चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन फोडलं आणि त्यातील पैसा लंपास केला. सीसीटीव्हीत हे दोघं चोरटे रेकॉर्ड झाले असले तरी देशातील सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचा गलथान कारभार या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलाय. या एटीएममध्ये कोणताही सुरक्षा रक्षक नाही, कोणतीही अलर्ट करणारी सुरक्षा यंत्रणा नाही, सीसीटीव्ही कॅमेरे कालबाह्य झालेले आहेत.
हेच एटीएम आतापर्यंत दोन वेळा फोडलं गेलंय तरी बँक प्रशासन काही सुधरायला तयार नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.