खामगाव तालुक्यात रस्त्याचा प्रश्न पेटला

खामगाव तालुक्यात रस्त्याचा प्रश्न पेटला

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रस्त्याचा प्रश्न पेटला आहे. गावाला रस्ता नसल्याने तेथील जनतेचे प्रचंड हाल होतात. तर, पावसाळ्यात शाळा, रुग्ण या सर्वांचीच होरपळ होते. त्यामुळे, गावाच्या रस्त्यासाठी विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण केले आहे.

खामगाव तालुक्यातील बेलुरा गावात स्वातंत्र्यप्राप्तीपासून गावाला रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी होरपळ होत असते. शिवाय गावातील रुग्ण, गरोदर महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी खाटेवर टाकून रुग्णालयात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहेत. विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करत खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. या आमरण उपोषणाचा चौथा दिवस सुरु आहे. एका उपोषणकर्त्याची तब्येतदेखील खालावली आहे. मात्र जोपर्यंत बेलुरा गावासाठी रस्ता होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version