रितेशच्या ‘माऊली’चा पोस्टर रिलीज, प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज..

रितेशच्या ‘माऊली’चा पोस्टर रिलीज, प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज..

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलीवुडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख ‘लय भारी’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आज म्हणजेच सोमवारी आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

रितेशने आपल्या मराठी चित्रपटाचा हा पोस्टर सोशल मिडियावर शेअर केला आहे. रितेशच्या या नवीन मराठी चित्रपटाचे नाव ‘माऊली’ असून चित्रपटाच्या रिलीजची तारीखही घोषित करण्यात आली आहे.

यावर्षी 21 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून रितेश आणि जेनिलिया देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनी या होम प्रॉडक्शनमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

क्षितिज पटवर्धन यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर अजय-अतुल या चित्रपटाचे संगीतकार आहेत.

तसेच या चित्रपटात रितेशसह अभिनेत्री सयामी खेर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version