ऋषिकेश देशमुखांना न्यायालयाचा दिलासा नाही

ऋषिकेश देशमुखांना न्यायालयाचा दिलासा नाही

 अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा मिळालेला नाही. ऋषिकेश देशमुख यांच्या अटक पूर्व जामिनावरील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

  ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी  ऋषिकेश देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होणार आहे.

  आर्थिक घोटाळाप्रकरणी ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स बजावले होते. ईडीने चौकशीसाठी ऋषिकेश देशमुख यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ते ईडी चौकशीला हजर न राहता त्यांनी न्यायालयाचे दार वाजवले. मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी १२ नोव्हेंबरला ऋषिकेश यांच्या जामीन अर्जाची सुनावणी होणार होती. मात्र आजही ऋषिकेश देशमुख यांना दिलासा मिळालेला नाही. ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पुढे ढकलली असून २० नोव्हेंबर रोजी त्यांची सुनावणी होणार आहे.

अनिल देशमुखांना १५  नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

  खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी सत्र न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला असून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version