मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीत प्रवाशांचा उद्रेक; भाडी नाकारल्यानं प्रवाशांनी रिक्षाच रोखून धरल्या

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीत प्रवाशांचा उद्रेक; भाडी नाकारल्यानं प्रवाशांनी रिक्षाच रोखून धरल्या

जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली

 

डोंबिवलीत गुरूवारी रात्री रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांचा संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला.

 

डोंबिवलीच्या केळकर रोडवर स्कायवॉकखाली असलेल्या रिक्षास्टँडवर गुरूवारी रात्री काही रिक्षाचालकांनी भाडी नाकरली. त्यामुळे प्रवाशांचा संयम संपला आणि प्रवाशांनी

रिक्षाच रोखून धरल्या.

 

तब्बल अर्धा तास हा सगळा गोंधळ सुरू होता. रिक्षाचालकांच्या या मनमानीवर पोलिसांकडून काहीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

 

दरम्यान, प्रवाशांनी जरी संतापून रिक्षा अडवल्या असल्या तरी या मागच्या भावना तीव्र आहेत. रिक्षावाल्यांच्या मनमानीला चाप कधी बसणार, हा प्रश्न उपस्थित आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version