जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कृषी उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर लावला जाणार नाही असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते. मात्र, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी मात्र श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावण्याची सूचना केली आहे.
शेतीच्या उत्पन्नावर कर न लावण्याचे घटनात्मक र्निबध केंद्र सरकारवर आहेत. राज्यांना मात्र असे कोणतेही र्निबध नाहीत. त्यामुळे, राज्यांनी सरसकट सर्व शेतकऱ्यांना एकाच मापात न तोलता त्यांच्या अधिकारात श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लावावा, असे सुब्रमणियन म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.