वृत्तसंस्था, नवी दिल्ली
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौ-यावर चालले आहेत. यावेळी सुट्ट्यांच्या निमित्ताने राहुल गांधी आपल्या आजीच्या घरी चालले आहेत. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून आपण फिरायला चाललो असल्याची माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, ‘माझी आजी आणि कुटुंबाला भेटण्यासाठी काही दिवसांसाठी जात आहे. त्यांच्यासोबत काही वेळ घालवणार आहे’.
राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहेत. मध्यप्रदेशातील मंदसौर येथे झालेल्या हिंसाचारानंर राहुल गांधी पीडितांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळी रस्त्यातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. याआधी सहारनपूरमधील हिंसाचारानंतर देखील राहुल गांधी पीडितांना भेटण्यासाठी गेले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.