‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा’

‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा’

महाराष्ट्रात जारी केलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यासाठी साधी महंत आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये रामकुंडावर या संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व आखाड्यांचे महंत तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थिती दर्शवली. या बैठकीत राज्य सरकारकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. गेले काही दिवस धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितींमध्ये वाद सुरु आहेत. अशामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोधात साधू संत आक्रमक आहे.

यासंदर्भात नाशिकमध्ये बैठक झाली असून यात जादूटोणा विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी आवाहन करत नाशिकमधील साधू म्हणून त्यांना एकत्र केले. नाशिकमधील सर्व साधू महंत एकवटले असून राज्य सरकारला निवेदन करणार आहेत की, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रात लवकरात लवकर रद्द करावा. कारण या कायद्याचा जो उद्देश आहे हा कुठेतरी भरकटला आहे. फक्त आणि फक्त हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री जोशी यांनी केली आहे.

यापुढे असा पाखंडीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मौलाना, फादरी, भन्ते जे दैवी शक्ती असल्याचा दावा करतात व भाविक भक्तांना लुबाडण्याचे काम करीत आहेत. तसेच त्यांच्या भोळेपणाचा व भावनिक मनोवृत्तीचा गैरफायदा घेतात. अशा मौलाना, फादरी, भन्ते यांनी आपली दैवी शक्ती सिद्ध करावी आणि ५१ लाख रुपयांचा धनादेश घेऊन जाण्याचे खुले आव्हान अनिकेतशास्त्री यांनी यावेळी केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version