साताऱ्यात कोरेगाव तालुक्यातील किल्ले वर्धनगड येथे अतिक्रमण केलेली दर्गा हटवण्याचे काम सोमवारी रात्रीपासून सुरू आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वर्धनगड किल्ल्यावर दर्गा अनधिकृत असल्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी सातारा जिल्हा प्रशासनाला निवेदन देत ही दर्गा हटवण्याची मागणी केली होती त्यानुसार वन विभाग आणि सातारा पोलीसांच्या बंदोबस्तात ही दर्गा हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.