मुंबई, २३ जून, प्रतिनिधी : बॉलीवूडच्या बऱ्याच अभिनेत्री या त्यांच्या अप्रतिम सौंदर्यासह त्यांच्या फिटनेस साठी देखील ओळखल्या जातात. अशा अभिनेत्रींमध्ये दिशा पटाणी हिचे हमखास नाव घेतले जाते. दिशाच्या बोल्ड लुकचे लाखो चाहते आहेत. अशातच आता दिशाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना अभिनेता टायगर श्रॉफची आठवण झाली आहे.
अभिनेत्री दिशा पटाणी ही स्वतःला नेहमीच फिट ठेवते. तिच्या दैनंदिन जीवनातील व्हिडिओ ती नेहमीच समाज माध्यमांवर सामायिक आकारात असते. दरम्यान अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ सामायिक केलाय. यात ती फ्लाइंग किक्स मारताना दिसतेय. यात तिने हवेत उडी मारत 360 डिग्री किक मारली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी तिच्या फिटनेसचे कौतुक केले तर अनेकांनी टायगर श्रॉफचा उल्लेख केला. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘टायगर श्रॉफने शिकवले आहे’.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.