जिओनंतर आता रिलायन्सनेही आणला फ्री डेटा-कॉलिंगसाठी सर्वात स्वस्त प्लान

जिओनंतर आता रिलायन्सनेही आणला फ्री डेटा-कॉलिंगसाठी सर्वात स्वस्त प्लान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जिओ कम्युनिकेशन स्ट्राँग करण्यासाठी कंपनी दररोज नवनवीन ऑफर्सची भडिमार करते. तर इतर टेलीकॉम कंपन्यादेखील विविध टेरीफ प्लॅन आणून ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 

 

या स्पर्धेत आता रिलायन्स कंपनीने आपले पाऊल टाकले आहे. रिलायन्सने 299 रुपयांचा नवा प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. रिलायन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या ऑफरची माहिती देत हा रिलायन्सचा सर्वात स्वस्त प्लॅन असल्याचा दावा केला आहे.

 

जिओच्या धनाधन ऑफरला टक्कर देण्यासाठी वोडाफोन, एअरटेलनेसुध्दा विविध टेरीफ प्लॅन आणले आहेत. 299 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना महिनाभरासाठी कॉलिंग, डेटा आणि मेसेज फ्री असणार आहेत. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना Eshop.com या

वेबसाइटवर जावे लागणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version